कोकणची जगभर ओळख हा पर्यटनाचा कणा........!!
पश्चिमेकडील अथांग सागर तर पूर्वेकडे आभाळाशी स्पर्धा करणारे सहयाद्रीचे कडे यामधील चिंचोळी पट्टी म्हणजे कोकण प्रदेश.खरोखरच कोकण प्रदेश म्हणजे निसर्गाने केलेली मुक्त हस्त उधळण. सागर किनारे, बंदरे, किल्ले, लेणी, ऐतिहासिक ठिकाणे, गरम पाण्याची कुंडे, धबधबे, मंदिरे, जत्रा, उत्सव, विविध जाती-प्रजातींचे पशु, पक्षी, वैविधतेने नटलेला हिरवागार निसर्ग, कोकणातल्या लोकांची अवस्था कस्तुरीमृगासारखी. आमच्याकडे असलेल्या गोष्टींचा आम्हालाच थांगपत्ता नाही. आपल्या जवळच्या ठेव्याची जाण करून घेत ती दुस-याला सांगण्यात आपण यशस्वी झालो तर कोकण हे जागतीक पर्यटनस्थळ बनेल यात तिळमात्र शंका नाही. कोकणचा कॅलिफोर्निया करू अशा घोषणा करत परंतु रासायनिक कारखान्यांना उत्तेजन देत कोकण भकास करण्यावर भर देण्यापेक्षा, कोकणाचे कोकणीपण जपणे त्याला प्राधान्य देणे, कोकणप्रांताची ओळख जगभर पसरविणे हाच खरा कोकण पर्यटनाचा मुख्य कणा आहे. तो जपलाच पाहिजे. शहरी बकालीपणा कंटाळलेला, घडयाळयाच्या काटयावर धावून दमलेला, शरिरावरचा व मनावरचा ताण हलका करण्यासाठी येणा-या पर्यटकाला कोकणातला शांतपणा भावतो, प्रदुषण विरहित सागरात डुंबायला आवडते, झावळयांनी शाकारलेल्या, शेणाने सारवलेल्या कुटिरात कोकणी पदार्थाचा आस्वाद घेणे हवे असते. दिवसाच्यो कोणत्याही प्रहरी हिरव्यागार निसर्गातील पशु पक्षांच्या मंजुळ आवाजात मनावरील ताण घालविणे हवे असते. खरेतर देशी-विदेशी पर्यटकांना कोकणचा कोकणीपणा भावतो. परंतु विकास, इंफ्रास्ट्रक्चर वगैरे जडजड शब्दांच्या मागे धावत पर्यटकांना हवे हवे ते कोकण आपण त्यांच्यापासून हिरावून नेत आहोत याचे भान कोणालाही नाही. आपणाकडे आलेल्या पर्यटकाला आपल्याकडील गोष्टींची ओळख करून द्यावयास हवी, आपल्याकडील वेगळेपण त्यांच्या निदर्शनास आणून द्यावयास हवे. याचा विचार करून स्थानिक पर्यटनाशी संबंधीत व्यवसाय, गोष्टींना प्राधान्य, पाठींबा देत शाश्वत पर्यटनाची कास धरणे गरजेचे आहे. पर्यटन विकासासाठी काय करायला हवे! अथांग प्रदुषण विरहित महासागर, मऊसून सागर पुळणी, हिरव्यागार झाडांनी आच्छादलेले डोंगर, तांबडी मऊ माती, कोकण मेवा यांचे अप्रुप कोकणातल्या लोकांपेक्षा बाहेरच्या लोकांना अधिक आहे. गावा गावांना जोडणारे रस्ते झाले. कोकण रेल्वेचे स्वप्न सत्यात उतरले पण स्थानिक माणसांची मनोभूमिका तशीच राहिली तरी बदलली पाहिजे. कोकणातील निसर्गविविधता, दुर्ग, सागरकिनारे, मंदिरे, घरगुती पाहुणचार यांचा आस्वाद इथे येणाऱ्यांनी घ्यावा अस पर्यटन व्हावं. इथल पर्यटन हा विकासाचा आत्मा बनावयास हवा. नेहमीच्या पर्यटनाबरोबरच, इको टुरिझम, अ‍ॅडव्हेंचर टुरिझम, अ‍ॅग्रो टुरिझम, कोस्टल टुरिझम, मेडिकल टुरिझम अशा नाना अंगानी कोकणातील पर्यटन विकास व्हावा. कोकणचा कोकणीपणा, इथली संस्कृती ही खरी कोकणाची पर्यटन श्रीमंती आहे. ती जशी आहे तशी पण निटनेटकी सजविणे, भोवताली आवश्यक गोष्टींची पण मूळपणाला धक्का न लावता निर्मिती करणे व ते पर्यटकांसमोर मांडणे गरजेचे आहे. कोकण कायमच स्वच्छतेला प्राधान्य देत आले आहे. त्यात खंड पडू न देणे. नियमांच्या गुंतवळयात न अडकता, अडकवता शासनाने भरीव मदत करणे अपेक्षीत आहे.जागोजागी माहितीदर्शक फलक, संपर्क केंद्र तयार करणे, स्थानिक वाहतूकदारांना प्रोत्साहन देणे, माहिती पुस्तके उपलब्ध करून देणे, माहिती देणारे गाईड उपलब्ध करणे, कोकणी पदार्थ, मेवा यांना उत्तेजन देणे यासारख्या गोष्टी प्रत्येकाने करावयास हव्या. कोणाच्या मदतीची अपेक्षा न बाळगता स्वत:हून जे शक्य होईल त्या परिने येणा-या पर्यटकाला मदत करावयास हवी. खरे तर कोकणचे कोकणपण घालविणा-या औद्योगिकरणामागे येणारा प्रदुषणाचा भस्मासूर व बकालपणा टाळावयाचा असेल तर पर्यटनाला पर्याय नाही, त्यातच कोकणचे निसर्गसौंदर्य टिकेल आणि सत्वही
पर्यटनाच्या नजरेतून रत्नागिरी जिल्हा

Posted on:16/02/2019

तालुका मंडणगड

Posted on:18/02/2019

तालुका खेड

Posted on:17/02/2019

*कोकणातलं खासगी अभयारण्य*

Posted on:26/03/2019

कोकणची ऊर्जा...... " शिमगोत्सव "

Posted on:27/03/2019

कोकणातील निसर्ग नवलकोकणातील निसर्ग नवल

Posted on:24/03/2020

अपरांत......" कोकण "

Posted on:19/04/2020

माहिती.........." रत्नागिरीची "

Posted on:04/05/2020



As its name describes all it is exclusive for kokan. Kokan is also known as PARSHURAM BHUMI. Kokan has Scenic, Beautiful nature, Sea, lots of attractions, Temples and Adventure games etc.